By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 15 Dec 2024 Paper 2 Marathi, Question 127

Topic: Grammar

Passage

सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
पडणाऱ्या पावसाच्या आवाजाच्या आकर्षणाबरोबर मला आणखी एका आवाजाचं आकर्षण वाटे. तो आवाज म्हणजे घुबडाचा आवाज. आमच्या घराजवळ, ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठ्ठं झाड आहे. त्या झाडावर बसून मध्य रात्री घुबड घुमत असे. त्याचा घुत्कार ऐकला की काळजात धडकी भरे. एकीकडे पावसाची संततधार लागलेली असे. त्याचा रप रप आवाज काळोखाची भयाणता वाढवी त्या भयाणतेत घुबडाचा आवाज भर घाली. घुबड घुमायला लागलं की मी टक्क जागी होई. आईला किंवा मोठ्या बहिणीला बिलगे. कानात प्राण आणून तो आवाज ऐके. खूप वेळ तो आवाज सहन होत नसे. काळजाचे ठोके वाढायला लागले, श्वास अडकायला लागले, भीतीने किंकाळी फोडावी वाटली की मी उठून धू ऽऽ म पळत सूटे. ओसरीवर बाबांची कॉट असे. माझ्या धावत येण्याची चाहूल त्यांना बरोबर लागे. ‘घाबरला का आमचा वाघ?’ बाबा विचारीत. मी त्यांच्या घोंगडीत शिरून त्यांना बिलगे. ‘थांब, थांब, हाकलू आपण घुबडीला’ असं म्हणत ते उठत काठी आपटून, आवाज करून तिला हाकलून देत. पुढे मोठी झाल्यावर, कॉलेजला जायला लागल्यावरसुध्दा मी घुबडीच्या आवाजाने जागी झाले की माझे बाबा तिला हाकलायला उठत, मी म्हणे, ‘नका हाकलू बाबा तिला, भीती नाही वाटत.’ खोल खोल विवरातून घुमत आल्यासारखा तिचा घुमारा काळजाला पिळ पाडू लागला की मी कुठल्यातरी अज्ञात विश्वात निघून जात असे.

घुबडीच्या आवाजाइतकाच भुरळ घालणारा आणि भीती वाटायला लावणारा दुसरा आवाज म्हणजे डोबीचा धबधबा. पुराचं पाणी खडकांवर, कपारींना आपटत आपटत फेसाळत पुढे जाऊन पन्नास-साठ फूट खोल दरीसारख्या भागात कोसळे. त्या कोसळण्याचा धाब ऽऽ धा ऽऽ ब आवाज रात्रीच्या निरव शांततेत भेसूर वाटे. जीवाचा कान करून काळजावर आपटणारा तो आवाज मी झोप लागेपर्यंत ऐकत असे.

Q127

“ओढ्याच्या पलीकडे वडाचं खूप मोठ्ठं झाड आहे.” या वाक्यातील अव्यय ओळखा.

  1. (1) ओढा
  2. (2) पलीकडेCorrect answer
  3. (3) वड
  4. (4) झाड

Solution.

CBSE answer: (2)

उत्तर: (2) पलीकडे

  1. अव्यय म्हणजे लिंग, वचन, विभक्तीनुसार रूप न बदलणारा शब्द.
  2. वाक्यात 'ओढ्याच्या पलीकडे' मध्ये 'पलीकडे' हा शब्द नामाला जोडून येतो आणि स्थान दाखवतो; हे शब्दयोगी अव्यय आहे.
  3. ओढा, वड आणि झाड ही नामे आहेत; त्यांची रूपे बदलतात (ओढ्याच्या, वडाचं).

सावधान: 'ओढा' वाक्यात आहे, पण ते नाम आहे, अव्यय नाही.