‘दहावी परीक्षा’ अधोरेखित शब्द ओळखा.
- (1) गुण विशेषण
- (2) गणनावाचक संख्याविशेषण
- (3) क्रमवाचक संख्याविशेषण
- (4) अव्ययसाधित विशेषण
You are reading the question paper with answers. This is not the timed test: no clock is running and nothing is being scored.
Go to the timed test →सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
कंपासपेटी आज खूप खूश होती. तिला छान नटवलं होतं ना मुग्धाने. महत्त्वाचं म्हणजे तिनं तिच्यातला सगळा निरुपयोगी कागदांचा पसारा काढून टाकला होता. नवीन पेनं, नुकतंच टोक काढलेली पेन्सिल, वेष्टनात लपेटलेला नवा खोडरबर, नवा कोरा धारदार शार्पनर अशा सगळ्या नवनव्या वस्तूंनी सजलेली कंपासपेटी आपणच परतपरत आपलं रुपडं निरखत होती. ‘मुग्धा काय नि कित्ती वस्तूंची अडगळ करते नेहमी माझ्यामध्ये’ असं तिला सारखं वाटत होतं. काय काय भरून ठेवते ती ‘कसले कसले स्टिकर्स’ पेन्सिलचा कचरा, कागदाचे तुकडे आणि बरंच काही, पण उद्या मुग्धाची दहावीची परीक्षा सुरू होतेय त्यामुळे परीक्षेच्या आधी तिनं कंपासपेटीचं रूपच पालटून टाकलं होतं. आज तिला स्वच्छ नीटनेटकी केली होती.
ती स्वतःचं रूप निरखत असतानाच मुग्धानं तिला सॅकमध्ये ठेवलं. सॅकमध्ये गेल्यावर तिला एकदम प्रशस्त बंगल्यामध्येच गेल्यासारखं वाटलं. नेहमी पुस्तकं, वह्या, रंगपेटी, पट्टी, कागदाच्या गुंडाळ्या यांच्या बरोबर राहायचं म्हणजे तिचा जीव घुसमटून जात होता अगदी. पण कंपासपेटीला जास्त काळजी वाटत होती ती मुग्धाच्या आईची. दहावीची परीक्षा मुग्धाची आणि तिच्यापेक्षा काळजी आईला. जणूकाही आईचीच परीक्षा होती. आई तर सतत अस्वस्थ होती. माझ्या मनूला परीक्षा द्यायला जमेल ना! दहावीची परीक्षा कठीण तर असणार नाही. असे एक ना अनेक प्रश्न आईच्या मनात येत होते आणि आईला त्यामुळे खूप ताण आला होता. आईला ताण आला तसा तो मुग्धालाही आला होता. तिनं तसं आपली मैत्रीण राहीला बोलूनही दाखवलं. त्यावर राहीनं तिला एक सुंदर गोष्ट सांगितली. ती म्हणाली, “आपण मागे सहलीला गेलो तेव्हा एका गावात बसमधून उतरलो, आठवतंय ना तुला ?”
“हो तर आठवतं ना.”
“मग आपण चालतचालत एका टेकडीच्या दिशेने गेलो. टेकडी चढताना जरा अवघड गेलं, पण टेकडीवर पोहोचल्यावर पुन्हा एक सुंदर रस्ता दिसू लागला आणि आपला पुढचा प्रवास सुरू झाला.”
“हो..” राही पुढे म्हणाली, “मला तरी दहावीची परीक्षा तशीच वाटते. खरं तर ती इतर परीक्षांसारखीच असते. पण थोडीशी वेगळी. म्हणजे ती पूर्ण वर्षांच्या अभ्यासक्रमावर असते. ती दुसऱ्या शाळेत जाऊन द्यावी लागते. परीक्षक वेगळे असतात, पण ती चांगल्या प्रकारे दिली, व्यवस्थित उत्तीर्ण झालो तर त्या टेकडीवरून जसा आपल्याला सुंदर रस्ता दिसला तसा दिसू शकतो.” कंपासपेटी जरी सहलीला गेली नव्हती तरी राही जे सांगत होती ते चित्र तिच्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभं राहिलं. कंपासपेटी त्यावर विचार करत असतानाच मुग्धा म्हणाली, “हो गं, हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. अजून एक सुचतंय मला सांगू का ?” राहीनं होकार दिल्यावर मुग्धा म्हणाली, “आपल्या वर्गातले काहीजण त्या टेकडीवर स्वतःहून थांबले, ते पुढे आलेच नाहीत. त्यांनी तिथे साफसफाई केली. झाडं लावली. झाडावर चढायला शिकले. काही थोडावेळसाठी थांबले तर काहींनी पुढे जाताना मार्ग बदलले. तसंच असतं ना दहावीच्या परीक्षेचं.”
यावर टाळी देत दोघीही हसल्या होत्या आणि तेव्हापासून मुग्धाच्या मनावरचा दहावीच्या परीक्षेचा ताण निघून गेला.
‘दहावी परीक्षा’ अधोरेखित शब्द ओळखा.
कंपासपेटीला कोणाबद्दल जास्त काळजी वाटत होती ?
‘निरखणे’ या शब्दाचा समानार्थी आशय नसलेला पर्याय शोधा.
सजवलेल्या कंपासपेटीत नसलेला घटक कोणता ?
कोणाच्या सान्निध्यात कंपासपेटीचा जीव गुदमरत असे ? चुकीचा पर्याय शोधा.
दहावीच्या परीक्षेबाबत राहीने कोणती गोष्ट सांगितली नव्हती ?
मुग्धाच्या मनातील दडपण या कारणास्तव नाहीसं झालं.
एकवचन–अनेकवचनी शब्दजोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा.
पुढीलपैकी विशेषनाम असलेला पर्याय शोधा.
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
झुळूझुळू वाहे नदीचे पाणी।
आलंय कुठून ? सांगेल का कुणी ?
डोंगरदऱ्यात झालाय उगम।
खळाळत वाहते प्रदेश असता दुर्गम।
वाटेत भेटती गावे शेजारी।
गरज भागवी त्यांची सारी।
रानावनात झाडे अन् वेली।
तृषार्तांना तीच असे वाली।
का होते तिची दुर्दशा पुढे।
गृहीत धरती बिचारीला सगळे।
केरकचरा आणि सांडपाणी।
जलप्रदूषण हे केले तुम्ही–आम्ही।
जीवनदायिनी ही आपली।
अवकळा सारी तिला आणली।
वेळीच मानवा हो जागा।
ठेव शुद्ध रे तू सरिता।
कवीला कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाहीये ?
‘आपण नदीला अवकळा आणली’ असे कवीला का वाटते ? त्याला नेमके काय सुचवायचे आहे ?
‘नदी’ शब्दाचा पर्यायवाची शब्द शोधा.
दुर्गम प्रदेशात तिचा प्रवाह नेमका कसा असतो ?
कवी नदीचा ‘वाली’ असा उल्लेख कोणासाठी करतो ?
नदी आपल्या प्रवासात कोणाच्या गरजा भागवते ?
चाचण्या आणि मूल्यमापनाचा शिक्षक, विद्यार्थी आणि साधनसामग्रीवर पडणारा प्रभाव म्हणजे __________.
शाळांनी मिश्र द्वैभाषिकत्त्वाचे अनुसरण केले पाहिजे कारण ते __________.
स्वरशैली, सूर, भर देणे आणि नाद या भाषाशास्त्रीय कार्यांना __________ म्हणतात.
भारतातील भाषा या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?
भाषा वर्गातील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनात गटागटातून दिलेल्या विषयावर एक जाहिरात सादर करतात. या पद्धतीने भाषा शिकणे म्हणजे __________.
शिक्षिका विद्यार्थ्यांना रेस्टॉरेंटमधील शब्दावलींची ओळख होण्यासाठी एक नियत कार्य देते. या उपक्रमाचे कोणते उद्दिष्ट असायला पाहिजे ?
पुढीलपैकी कोणती शिक्षण विचारधारा असे मानते की, भाषा मग ती मौखिक असो किंवा अ–मौखिक (Non-verbal) सवय लावण्याच्या प्रक्रियेतून घडते ?
कथेचे स्थान आणि काळ/वेळ यांना __________ म्हणतात.
भाषा वर्गात शिक्षिका विद्यार्थी गटाला सांगते, तुमच्यापैकी एकेकानं क्रेता, घर विकणारा, भवन स्वामी आणि भाडेकरू भूमिका करायच्या. इतर मुलांना त्यांचा अभिनय पाहणे आणि त्यांचे संभाषण ऐकण्यास सांगते. या उपक्रमाला काय म्हणता येईल ?
एक भाषा शिक्षिका पाचवी इयत्तेच्या वर्गातील मुलांसाठी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, जसे वर्तमानपत्र, मेनू कार्ड आणि ट्रेनची तिकिटे शिकविण्यासाठी आणते. मुलांनी शिकावे यासाठी ती काय करते ?
ऐकण्याचा सराव यासाठीचे नियोजन करताना पुढीलपैकी कोणती बाब महत्वाची नाही ?
भारतातील बहुभाषिकतेचा हेतू शिक्षकांना __________ समजावे हा आहे.
पुढीलपैकी कोणते भाषिक कौशल्य ग्रहण कौशल्य म्हणून ओळखले जाते ?
ऐकण्याच्या प्रक्रियेत याचा समावेश असतो __________.
रकाना A मध्ये दिलेल्या अध्यापन पद्धतीशी सुसंगत रकाना B मधील अध्यापन पद्धतीचे ज्ञान किंवा संबंधित उपक्रमाची जोडी जुळवा.
| A | B |
|---|---|
| (a) संभाषणात्मक भाषा शिक्षण | (i) सामाजिक मान्यता असलेली आणि योग्य संदर्भ असलेली भाषा |
| (b) थेट पद्धती | (ii) मूक वाचन |
| (c) व्याकरण भाषांतर | (iii) लेखी साहित्यिक मजकूर |
| (d) वेस्टची नवी पद्धती (West’s New Method) | (iv) आगमनात्मक (inductively) व्याकरण शिक्षण |
सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
दिवाळीची चाहूल लागताक्षणी स्त्री-मन आनंदाने नाचू लागते. बदलत्या काळाबरोबरच स्त्रीजीवनाचे संदर्भही बदलले आहेत. तिच्या कार्यक्षेत्राचा परीघ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. म्हणूनच दिवाळीच्या सुट्टीत चार-दिवस निवांत निसर्गाच्या सानिध्यात घालविण्याची स्वप्ने ती सहज बघते; पण ज्या काळात स्त्री फक्त मर्यादित क्षेत्रात जगत होती, तेव्हा तिची मानसिकता कशी होती ? आपल्या सणा-वारांविषयी तिच्या काय भावना होत्या. या सर्वांचेच उत्तर आपल्याला लोकसाहित्यातून मिळते. लोकगीतातून स्त्री-मनाचे हे हुंकार जागोजागी आढळतात. दिवाळीची आतुरतेने वाट बघणाऱ्या या स्त्रीने तिच्या मनाची असंख्य स्पंदने ओवीबद्ध करून ठेवली आहेत. या ओवीगीतांमधून भारतीय संस्कृतीचे वैविध्यपूर्ण दर्शन घडते. किंबहुना, स्त्रियांची ओवीगीते तर भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. आपले सण, उत्सव, विधी, परंपरा या सर्वांचेच प्रतिबिंब या गीतांमध्ये पडले आहे. तना-मनामध्ये चैतन्य निर्माण करणारी दिवाळी तर भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
दसरा दूर गेला, दिवाळी इसा दिशी असं म्हणत म्हणत या ओव्यांमधली गृहिणी कामाला लागते. सणांमध्ये सण दिवाळी सण मोठा हाच भाव सर्वत्र भरून राहतो, दिवाळीच्या स्वागताची तयारी घराघरांत होते. शेतकऱ्याच्या घरात धन-धान्य आलेलं असतं. गाई-गुरांचं कौतुक चाललेलं असतं. ‘दिवायीना दिन, बाई खेतीना पसारा,’ असं म्हणत घरात लगबग सुरू असते. अंगणात शेणाचा सडा शिंपला जातो, दारी रांगोळी काढली जाते. सख्या शेजारणी अंगणात जमा होतात. या सर्व वातावरणाचा देखावा या ओवीतूनही दृष्टीस पडतो.
शेजी घाली सडा माझ्या सड्याला भिडून
बंधुराज माझा आला रांगोळी मोडून
अशा सुबक रांगोळीभोवती पणत्यांची आरास केली जाते. सगळीकडे मंगलमय वातावरण निर्माण होते. सोन्या-चांदीने, माणिक-मोत्याने लक्ष्मीची पूजा मांडली जाते.
‘लक्षुमी गं बाई आली, आली तशी जाऊ नको.’
घरादाराला गं माझ्या अंतर देऊ नको.
असे म्हणत घरातील गृहिणी आपल्या घराचे सौख्य अबाधित राहावे, म्हणून प्रार्थना करते. लक्ष्मीसोबतच घरातील, दूध-दुभत्या जनावरांना ‘मानाचे स्थान’ असते. त्यांना औक्षण केले जाते. चार घास कौतुकाने भरविले जातात. ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ म्हणून हा सोहळा पार पाडला जातो. पूर्वी सासरी जाणाऱ्या लेकी-बाळीसोबत गोधन देण्याची प्रथा होती. रुक्मिणीलादेखील गाई आंदण दिल्याचे उल्लेख लोकगीतांतून आढळतात. या संदर्भात या ओवीतील माहेरवाशीणीचे मागणे पाहण्यासारखे आहे.
दिवाळी दसऱ्याची चोळी फाटून झाली चिंधी
नटव्या बंधुजीने मला औताला दिले नंदी
भारतीय संस्कृतीही कृषिसंस्कृती असल्याने सर्व जनजीवन या पशुधनाशी निगडित आहे. म्हणून सासुरवाशीणीला माहेरकडून या चोळी-बांगडीपेक्षा या पशुधनाची अधिक अपेक्षा असायची, कारण त्यामुळेच तिच्या जीवनात समृद्धी नांदायची.
लोकगीतातून स्त्रीमनाचे विविध पदर उलगडत जातात. प्रामुख्याने स्त्रियांची ही गीते म्हणजे दळण-कांडण करीत असताना प्रसवलेली असतात, त्यामुळे स्त्रीच्या भावविश्वाची अदीमताच यातून जाणवते. माहेर म्हणजे स्त्रीच्या ‘मर्मबंधातील ठेव’ अन् दिवाळी म्हणजे या सुखाची पर्वणीच ! तिच्या मनात दिवाळीविषयक अधिक उत्कंठा असते.
‘दिवायीना दिन बाई खेतीना पसारा’ यातील ‘खेतीना पसारा’ यातून काय सूचित केले आहे ?
लेखिकेच्या मते सासुरवाशिणीला माहेरकडून कशाची अधिक अपेक्षा असते ?
‘लक्ष्मीची पूजा’ यातील ‘लक्ष्मी’ हे काय आहे ?
‘दिवाळी सण मोठा’ यातील ‘मोठा’ हे काय आहे ?
प्रस्तुत उताऱ्यात शेतीची वस्तू म्हणून कोणता शब्द आलेला आहे ?
स्त्रीच्या मर्मबंधातील ठेव कोणती असते ?
उताऱ्यातील लोकगीतातून भाऊरायाचे आगमन कसे होते ?
स्त्रियांच्या ओवीगीतांतून पुढीलपैकी काय आढळत नाही ?
सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
पौष हा संक्रमणाचा महिना. थंडीचा कडाका यातलाच. दिवस मोठे होण्याची निशाणी याच दिवसांत मिळते. रूढ समजुतीप्रमाणे हेमंताची अखेर या महिन्याने होते. रामायणात ‘इष्ट ऋतु’ म्हणून हेमंताला गौरविले आहे. आपल्या उष्ण देशात थंडीच्या महिन्यांना, विशेषतः गव्हाची हिरवीगार सुंदर पिके शेतात डोलती ठेवणाऱ्या ह्या महिन्याला, पुष्टीचा महिना मानावे, यात काहीच नवल नाही. पावसाच्या मारझोडीत शेतातल्या डुलत्या पिकांचे सौंदर्य मनमुराद डोळ्यांत भरत नाही. चिखलाच्या डबक्यांनी माणूस व पिके यांच्यातले अंतर वाढते. पण हिवाळी पिकांचे तसे नसते. आकाश धरणीला धुक्याच्या मिषाने चहूबाजूंनी सांजसकाळ कवटाळीत असते. धुक्याचा जीवनदायी ओलावा आणि गारठा शेताशेतांतून हिरवा काटा तिच्या अंगावर फुलवीत असतो. सूर्याचे किरणही धुक्यातून आरपार जाताना धडपडतच गेलेसे वाटतात.
या दिवसांत सूर्यप्रकाशाच्या कांबी सकाळच्या वेळी धुक्याच्या पसाऱ्यातून मार्ग आक्रमीत असताना जशा स्पष्ट व रमणीय दिसतात तशा धुके ओसंडलेल्या हंगामात दिसत नाहीत. सूर्य वर आला आणि धुके विरलेसे वाटले तरी झाडाच्या मधून जे उन्हाचे कवडसे जमिनीवर वा घरांच्या छतांमधून, झरोक्यांमधून भिंतीवर पडतात, ते सारे या किरणांच्या शलाकांमधूनच पडलेले दिसतात. जणू काही हिवाळ्यात आपल्यापासून दूरदूर जाणाऱ्या धरणीला आकाशाने धुक्याने लपेटून टाकली असता आपल्या हातांनी चाचपडत चाचपडत सूर्य स्पर्शीत असतो. तिचे आकाशाच्या मिठीत दडलेले मुख प्रकाशाकडे वळवीत असतो. अगदी नाजूक सुखावह असे त्याचे किरण अनुनयाची कला कशी असावी, हे जणू काही प्रत्यक्ष दाखवीत असतात. मोठ्या रात्रीचा गारवा व विश्रांतीसुख अनुभवून तुष्ट, पुष्ट झालेली पृथ्वी आळसत आळसत सूर्यसन्मुख होत असते.
पौष महिन्याचा विचार मला आदिवासींच्या एक-दोन कथांशिवाय आता करताच येईनासा झाला आहे. पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. पृथ्वीचे खरे प्रेम आकाशावर पण दैवयोगाने लग्न होते सूर्याबरोबर. आकाश रडते, ते पावसाच्या रूपाने. त्याची मिठी मेघांच्या व धुक्याच्या रूपातली. पृथ्वीशी सूर्याचे मीलन सांजसकाळी होते. त्यावेळी आकाश तळमळते आणि सकाळी दहिवराचे अश्रू गाळते ! पौषातले उगवते तांबडे-लाल सौम्य सूर्यबिंब उगवताना झाडांवर कुंदाची ती पांढरीशुभ्र फुले दवाचे थेंब पाकळ्यांवर झेलून, आपल्या सुगंधाचा श्वास रोखून निश्चलपणे उभी असलेली पाहिली, की खरोखरच वरचे रूपक सार्थ झालेले वाटते आणि म्हणूनच पौषातला सूर्योदय पाहणे मला फार आवडते.
‘पृथ्वी आळसत आळसत सूर्यसन्मुख होत असते.’ यातील अधोरेखित क्रियापद कोणते ?
‘दहिवर’ शब्दाचा योग्य अर्थ कोणता ?
‘आकाश धरणीला धुक्याच्या मिषाने कवटाळीत असते.’ यातील अधोरेखित काय आहे ?
पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात, यातील ‘अनुनय’ या शब्दाचा समानार्थ कोणता ?
पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणण्याचे कारण __________.
पुढीलपैकी सामान्यनाम कोणते ?
पृथ्वी, आकाश आणि सूर्य यांच्या प्रेमकथेचे रूपक लेखिकेला कशामुळे उलगडले ?
पुढीलपैकी कोणते माध्यम समकालिक (Synchronous) आणि अ-समकालिक (Asynchronous) ऑनलाईन शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध करून देते ?
संस्कारक्षम मूल्यमापन (Formative assessment) या बाबतीत कोणते तंत्र आदर्श नाही ?
दैनंदीन वस्तूंचा वापर करून केलेले भाषा शिक्षण म्हणजे __________.
भारताचे शिक्षणात भाषा धोरण (त्रिभाषा सूत्र) पुढीलपैकी कशाला उत्तेजन देते ?
अधोगामी (Top-down) प्रक्रियेशी संबंधित नसलेला पर्याय कोणता ?
‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ कधी साजरा केला जातो ?
तुम्ही तुमचा सहकारी जो तुमचा मित्र ही आहे त्याला इमेल लिहिता. या प्रकारचा इमेल म्हणजे __________.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आणि आकलनात स्पष्टता येण्यासाठी समग्र अध्ययन-अध्यापन पद्धतीत केलेले मूल्यमापन म्हणजे __________.
द्वितीय भाषा वर्गामध्ये शिक्षक ‘आरोग्य म्हणजेच संपत्ती’ यावरील ध्वनिफीत लावतात. यानंतर ते मुलांना पत्रके वाटतात व त्यातील दिलेल्या पर्यायांपैकी अचूक उत्तर देण्यास सांगतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना कोणत्या बाबतीत सक्षम करायचे आहे ?
‘भाषा शिक्षणात चुका’ या संदर्भात कोणते विधान योग्य नाही ?
भाषा शिक्षणात सर्जनशीलता म्हणजे __________.
विद्यार्थ्यांला भाषेच्या संपर्कात आणले पाहिजे. चुका होणे हे याचे प्रमाण आहे की अध्ययन होत आहे. या मान्यतेचा पुरस्कार कोण करते ?
पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे ?
(a) डिस्लेक्सिया (Dyslexia) ही वाचन अक्षमता आहे.
(b) डिस्ग्राफिया (Dysgraphia) ही लेखन अक्षमता आहे.
(c) डिस्ग्राफिया (Dysgraphia) ही वाचन अक्षमता आहे.
(d) डिस्लेक्सिया (Dyslexia) ही लेखन अक्षमता आहे.
शासकीय शाळेची शिक्षिका, रीटा, दृष्य साधने आणि भाषा-खेळांचा वापर इयत्ता सातवीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी करते. रीटा कोणत्या अध्यापन सिद्धांताचा वापर करते ?
प्राणी हा मुख्य पात्र असलेली आणि सुगमपणे नीती शिकवण देणारी कथा म्हणजे __________.