लेखिकेच्या मते सासुरवाशिणीला माहेरकडून कशाची अधिक अपेक्षा असते ?
- (1) चोळीबांगडी
- (2) पशुधन
- (3) नंदी
- (4) औत
सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 121 ते 128 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
दिवाळीची चाहूल लागताक्षणी स्त्री-मन आनंदाने नाचू लागते. बदलत्या काळाबरोबरच स्त्रीजीवनाचे संदर्भही बदलले आहेत. तिच्या कार्यक्षेत्राचा परीघ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. म्हणूनच दिवाळीच्या सुट्टीत चार-दिवस निवांत निसर्गाच्या सानिध्यात घालविण्याची स्वप्ने ती सहज बघते; पण ज्या काळात स्त्री फक्त मर्यादित क्षेत्रात जगत होती, तेव्हा तिची मानसिकता कशी होती ? आपल्या सणा-वारांविषयी तिच्या काय भावना होत्या. या सर्वांचेच उत्तर आपल्याला लोकसाहित्यातून मिळते. लोकगीतातून स्त्री-मनाचे हे हुंकार जागोजागी आढळतात. दिवाळीची आतुरतेने वाट बघणाऱ्या या स्त्रीने तिच्या मनाची असंख्य स्पंदने ओवीबद्ध करून ठेवली आहेत. या ओवीगीतांमधून भारतीय संस्कृतीचे वैविध्यपूर्ण दर्शन घडते. किंबहुना, स्त्रियांची ओवीगीते तर भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. आपले सण, उत्सव, विधी, परंपरा या सर्वांचेच प्रतिबिंब या गीतांमध्ये पडले आहे. तना-मनामध्ये चैतन्य निर्माण करणारी दिवाळी तर भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
दसरा दूर गेला, दिवाळी इसा दिशी असं म्हणत म्हणत या ओव्यांमधली गृहिणी कामाला लागते. सणांमध्ये सण दिवाळी सण मोठा हाच भाव सर्वत्र भरून राहतो, दिवाळीच्या स्वागताची तयारी घराघरांत होते. शेतकऱ्याच्या घरात धन-धान्य आलेलं असतं. गाई-गुरांचं कौतुक चाललेलं असतं. ‘दिवायीना दिन, बाई खेतीना पसारा,’ असं म्हणत घरात लगबग सुरू असते. अंगणात शेणाचा सडा शिंपला जातो, दारी रांगोळी काढली जाते. सख्या शेजारणी अंगणात जमा होतात. या सर्व वातावरणाचा देखावा या ओवीतूनही दृष्टीस पडतो.
शेजी घाली सडा माझ्या सड्याला भिडून
बंधुराज माझा आला रांगोळी मोडून
अशा सुबक रांगोळीभोवती पणत्यांची आरास केली जाते. सगळीकडे मंगलमय वातावरण निर्माण होते. सोन्या-चांदीने, माणिक-मोत्याने लक्ष्मीची पूजा मांडली जाते.
‘लक्षुमी गं बाई आली, आली तशी जाऊ नको.’
घरादाराला गं माझ्या अंतर देऊ नको.
असे म्हणत घरातील गृहिणी आपल्या घराचे सौख्य अबाधित राहावे, म्हणून प्रार्थना करते. लक्ष्मीसोबतच घरातील, दूध-दुभत्या जनावरांना ‘मानाचे स्थान’ असते. त्यांना औक्षण केले जाते. चार घास कौतुकाने भरविले जातात. ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी’ म्हणून हा सोहळा पार पाडला जातो. पूर्वी सासरी जाणाऱ्या लेकी-बाळीसोबत गोधन देण्याची प्रथा होती. रुक्मिणीलादेखील गाई आंदण दिल्याचे उल्लेख लोकगीतांतून आढळतात. या संदर्भात या ओवीतील माहेरवाशीणीचे मागणे पाहण्यासारखे आहे.
दिवाळी दसऱ्याची चोळी फाटून झाली चिंधी
नटव्या बंधुजीने मला औताला दिले नंदी
भारतीय संस्कृतीही कृषिसंस्कृती असल्याने सर्व जनजीवन या पशुधनाशी निगडित आहे. म्हणून सासुरवाशीणीला माहेरकडून या चोळी-बांगडीपेक्षा या पशुधनाची अधिक अपेक्षा असायची, कारण त्यामुळेच तिच्या जीवनात समृद्धी नांदायची.
लोकगीतातून स्त्रीमनाचे विविध पदर उलगडत जातात. प्रामुख्याने स्त्रियांची ही गीते म्हणजे दळण-कांडण करीत असताना प्रसवलेली असतात, त्यामुळे स्त्रीच्या भावविश्वाची अदीमताच यातून जाणवते. माहेर म्हणजे स्त्रीच्या ‘मर्मबंधातील ठेव’ अन् दिवाळी म्हणजे या सुखाची पर्वणीच ! तिच्या मनात दिवाळीविषयक अधिक उत्कंठा असते.
लेखिकेच्या मते सासुरवाशिणीला माहेरकडून कशाची अधिक अपेक्षा असते ?
CBSE answer: (2)
उत्तर: (2) पशुधन
सावधान: ओवीत ‘नंदी’ आणि ‘औत’ आले आहेत, पण ती पशुधनाची उदाहरणे आहेत; लेखिकेचा सर्वसाधारण निष्कर्ष ‘पशुधन’ असा आहे. चोळीबांगडी तर कमी महत्त्वाची ठरवली आहे.