Q104
कवी नदीचा ‘वाली’ असा उल्लेख कोणासाठी करतो ?
- (1) डोंगरदऱ्यांसाठी
- (2) वृक्षवेलींसाठी
- (3) तहानलेल्यांसाठी
- (4) अवकळा आणणाऱ्यांसाठी
सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
झुळूझुळू वाहे नदीचे पाणी।
आलंय कुठून ? सांगेल का कुणी ?
डोंगरदऱ्यात झालाय उगम।
खळाळत वाहते प्रदेश असता दुर्गम।
वाटेत भेटती गावे शेजारी।
गरज भागवी त्यांची सारी।
रानावनात झाडे अन् वेली।
तृषार्तांना तीच असे वाली।
का होते तिची दुर्दशा पुढे।
गृहीत धरती बिचारीला सगळे।
केरकचरा आणि सांडपाणी।
जलप्रदूषण हे केले तुम्ही–आम्ही।
जीवनदायिनी ही आपली।
अवकळा सारी तिला आणली।
वेळीच मानवा हो जागा।
ठेव शुद्ध रे तू सरिता।
कवी नदीचा ‘वाली’ असा उल्लेख कोणासाठी करतो ?
CBSE answer: (3)
उत्तर: (3) तहानलेल्यांसाठी
सावधान: आधीच्या ओळीत 'झाडे अन् वेली' आहेत, म्हणून (2) चेही समर्थन करता येते; पण 'तृषार्त' या शब्दाचा थेट अर्थ (3) आहे.