By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Jul 2024 Paper 2 Marathi, Question 105

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
झुळूझुळू वाहे नदीचे पाणी।
आलंय कुठून ? सांगेल का कुणी ?
डोंगरदऱ्यात झालाय उगम।
खळाळत वाहते प्रदेश असता दुर्गम।
वाटेत भेटती गावे शेजारी।
गरज भागवी त्यांची सारी।
रानावनात झाडे अन् वेली।
तृषार्तांना तीच असे वाली।
का होते तिची दुर्दशा पुढे।
गृहीत धरती बिचारीला सगळे।
केरकचरा आणि सांडपाणी।
जलप्रदूषण हे केले तुम्ही–आम्ही।
जीवनदायिनी ही आपली।
अवकळा सारी तिला आणली।
वेळीच मानवा हो जागा।
ठेव शुद्ध रे तू सरिता।

Q105

नदी आपल्या प्रवासात कोणाच्या गरजा भागवते ?

  1. (1) गावांच्याCorrect answer
  2. (2) दऱ्यांच्या
  3. (3) सांडपाण्याच्या
  4. (4) जलप्रदूषणाच्या

Solution.

CBSE answer: (1)

उत्तर: (1) गावांच्या

  1. कवितेत लिहिले आहे, 'वाटेत भेटती गावे शेजारी । गरज भागवी त्यांची सारी ।'
  2. म्हणजे वाहत जाताना नदी वाटेतल्या गावांच्या सर्व गरजा पूर्ण करते.
  3. सांडपाणी आणि जलप्रदूषण या नदीच्या समस्या आहेत, गरजा नाहीत.

सावधान: 'दऱ्या' नदीच्या उगमाशी जोडलेल्या आहेत, गरजा भागवण्याशी नाहीत.