By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Jul 2024 Paper 2 Marathi, Question 103

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
झुळूझुळू वाहे नदीचे पाणी।
आलंय कुठून ? सांगेल का कुणी ?
डोंगरदऱ्यात झालाय उगम।
खळाळत वाहते प्रदेश असता दुर्गम।
वाटेत भेटती गावे शेजारी।
गरज भागवी त्यांची सारी।
रानावनात झाडे अन् वेली।
तृषार्तांना तीच असे वाली।
का होते तिची दुर्दशा पुढे।
गृहीत धरती बिचारीला सगळे।
केरकचरा आणि सांडपाणी।
जलप्रदूषण हे केले तुम्ही–आम्ही।
जीवनदायिनी ही आपली।
अवकळा सारी तिला आणली।
वेळीच मानवा हो जागा।
ठेव शुद्ध रे तू सरिता।

Q103

दुर्गम प्रदेशात तिचा प्रवाह नेमका कसा असतो ?

  1. (1) संथ वाहणारा
  2. (2) वेगवान
  3. (3) तुंबलेला
  4. (4) खळाळणाराCorrect answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) खळाळणारा

  1. कवितेत ओळ आहे, 'खळाळत वाहते प्रदेश असता दुर्गम'.
  2. म्हणजे दुर्गम, डोंगराळ भागात नदी खळखळ आवाज करत वाहते.
  3. प्रश्नात 'नेमका' असा शब्द आहे, म्हणून कवितेतील शब्दाशी जुळणारा पर्याय (4) योग्य.

सावधान: डोंगरात पाणी वेगाने वाहते म्हणून (2) वेगवान निवडले जाते, पण कवितेचा नेमका शब्द 'खळाळत' आहे.