पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणण्याचे कारण __________.
- (1) दिवस मोठा होतो
- (2) हिरवीगार पिके येतात
- (3) आकाशात धुके असते
- (4) धुक्यातून सूर्यकिरणे येतात
सूचना : पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 129 ते 135 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
पौष हा संक्रमणाचा महिना. थंडीचा कडाका यातलाच. दिवस मोठे होण्याची निशाणी याच दिवसांत मिळते. रूढ समजुतीप्रमाणे हेमंताची अखेर या महिन्याने होते. रामायणात ‘इष्ट ऋतु’ म्हणून हेमंताला गौरविले आहे. आपल्या उष्ण देशात थंडीच्या महिन्यांना, विशेषतः गव्हाची हिरवीगार सुंदर पिके शेतात डोलती ठेवणाऱ्या ह्या महिन्याला, पुष्टीचा महिना मानावे, यात काहीच नवल नाही. पावसाच्या मारझोडीत शेतातल्या डुलत्या पिकांचे सौंदर्य मनमुराद डोळ्यांत भरत नाही. चिखलाच्या डबक्यांनी माणूस व पिके यांच्यातले अंतर वाढते. पण हिवाळी पिकांचे तसे नसते. आकाश धरणीला धुक्याच्या मिषाने चहूबाजूंनी सांजसकाळ कवटाळीत असते. धुक्याचा जीवनदायी ओलावा आणि गारठा शेताशेतांतून हिरवा काटा तिच्या अंगावर फुलवीत असतो. सूर्याचे किरणही धुक्यातून आरपार जाताना धडपडतच गेलेसे वाटतात.
या दिवसांत सूर्यप्रकाशाच्या कांबी सकाळच्या वेळी धुक्याच्या पसाऱ्यातून मार्ग आक्रमीत असताना जशा स्पष्ट व रमणीय दिसतात तशा धुके ओसंडलेल्या हंगामात दिसत नाहीत. सूर्य वर आला आणि धुके विरलेसे वाटले तरी झाडाच्या मधून जे उन्हाचे कवडसे जमिनीवर वा घरांच्या छतांमधून, झरोक्यांमधून भिंतीवर पडतात, ते सारे या किरणांच्या शलाकांमधूनच पडलेले दिसतात. जणू काही हिवाळ्यात आपल्यापासून दूरदूर जाणाऱ्या धरणीला आकाशाने धुक्याने लपेटून टाकली असता आपल्या हातांनी चाचपडत चाचपडत सूर्य स्पर्शीत असतो. तिचे आकाशाच्या मिठीत दडलेले मुख प्रकाशाकडे वळवीत असतो. अगदी नाजूक सुखावह असे त्याचे किरण अनुनयाची कला कशी असावी, हे जणू काही प्रत्यक्ष दाखवीत असतात. मोठ्या रात्रीचा गारवा व विश्रांतीसुख अनुभवून तुष्ट, पुष्ट झालेली पृथ्वी आळसत आळसत सूर्यसन्मुख होत असते.
पौष महिन्याचा विचार मला आदिवासींच्या एक-दोन कथांशिवाय आता करताच येईनासा झाला आहे. पृथ्वीचा अनुनय आकाश व सूर्य दोघेही करतात. पृथ्वीचे खरे प्रेम आकाशावर पण दैवयोगाने लग्न होते सूर्याबरोबर. आकाश रडते, ते पावसाच्या रूपाने. त्याची मिठी मेघांच्या व धुक्याच्या रूपातली. पृथ्वीशी सूर्याचे मीलन सांजसकाळी होते. त्यावेळी आकाश तळमळते आणि सकाळी दहिवराचे अश्रू गाळते ! पौषातले उगवते तांबडे-लाल सौम्य सूर्यबिंब उगवताना झाडांवर कुंदाची ती पांढरीशुभ्र फुले दवाचे थेंब पाकळ्यांवर झेलून, आपल्या सुगंधाचा श्वास रोखून निश्चलपणे उभी असलेली पाहिली, की खरोखरच वरचे रूपक सार्थ झालेले वाटते आणि म्हणूनच पौषातला सूर्योदय पाहणे मला फार आवडते.
पौष महिन्याला संक्रमणाचा महिना म्हणण्याचे कारण __________.
CBSE answer: (1)
उत्तर: (1) दिवस मोठा होतो
सावधान: पिके, धुके आणि सूर्यकिरणे यांचे वर्णन उताऱ्यात आहे, पण ती संक्रमणाची कारणे म्हणून सांगितलेली नाहीत.