By signing in you confirm you are 18 or older, or have your parent’s or guardian’s consent.

CTET 7 Jul 2024 Paper 2 Marathi, Question 100

Topic: Poem comprehension

Passage

सूचना : पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा.
झुळूझुळू वाहे नदीचे पाणी।
आलंय कुठून ? सांगेल का कुणी ?
डोंगरदऱ्यात झालाय उगम।
खळाळत वाहते प्रदेश असता दुर्गम।
वाटेत भेटती गावे शेजारी।
गरज भागवी त्यांची सारी।
रानावनात झाडे अन् वेली।
तृषार्तांना तीच असे वाली।
का होते तिची दुर्दशा पुढे।
गृहीत धरती बिचारीला सगळे।
केरकचरा आणि सांडपाणी।
जलप्रदूषण हे केले तुम्ही–आम्ही।
जीवनदायिनी ही आपली।
अवकळा सारी तिला आणली।
वेळीच मानवा हो जागा।
ठेव शुद्ध रे तू सरिता।

Q100

कवीला कोणत्या गोष्टीचा उलगडा होत नाहीये ?

  1. (1) अवकळा का आली
  2. (2) प्रदूषण कसे झाले
  3. (3) कोणी गृहीत धरले
  4. (4) नदीचे पाणी कुठून आलेCorrect answer

Solution.

CBSE answer: (4)

उत्तर: (4) नदीचे पाणी कुठून आले

  1. कवितेच्या सुरुवातीला कवी विचारतो, 'आलंय कुठून ? सांगेल का कुणी ?'
  2. म्हणजे नदीचे पाणी कुठून आले याचा उलगडा कवीला होत नाहीये, म्हणून तो प्रश्न विचारतो.
  3. अवकळा, प्रदूषण आणि गृहीत धरणे यांची कारणे कवी स्वतःच कवितेत सांगतो.

सावधान: पुढच्याच ओळीत 'डोंगरदऱ्यात झालाय उगम' असे उत्तर येते, म्हणून (4) चुकीचा वाटू शकतो; पण प्रश्न कवीने सुरुवातीला कोणता प्रश्न विचारला यावर आहे.